देणे समाजाचेे....

सेवालय हे पुर्णपणे समाजावर अवलंबून आहे. समाजाला जाेडून काम करायचे असल्यामुळेच सरकारी मदत न घेण्याचा निर्णय घेतला हाेता. त्यात आम्ही यशस्वी झालाे आहाेत. सरकारला मर्यादा आहेत तसे समाजाला नाही. प्रामाणिक कामाच्या मागे समाज खंबीररणे उभा राहताे. हा अनुभव आज आम्ही घेत आहाेत. पुणे येथील कर्वे राेडवरील हर्षल हाॅल मध्ये “देणे समाजाचे ” एक सदभावना महाेत्सवाचे आयाेजन करण्यात आले आहे.आज दुसरा दिवस असून उद्यापर्यंत चालणा-या महाेत्सवात पुणेकरांनी गर्दी केली आहे. देण्यासाठी गर्दी याला काय म्हणावे. काल दिवसभरात लाखभर मदत पुणेकरांनी केली. पहिला स्टाॅल असल्याने सर्वांचे स्वागत करण्याची जबाबदारी सेवालयावर अालीय. चला अापणही “देणे समाजाचे ” महाेत्सवात सहभागी हाेवू या.